शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Book Festival : बुधवारी शांतता ठेवा...पुणेकर वाचत आहे..!

By श्रीकिशन काळे | Updated: December 9, 2024 13:04 IST

पुणे पुस्तक महोत्सवाचा उपक्रम;पुणे विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा थांब्यांवर नागरिक उपक्रमात सहभाग नोंदविणार

पुणे :पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या शांतता...पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, ग्रंथालये, वाचनालये अशा समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. पुणे मेट्रो, पुणे विमानतळ, रेल्वेस्थानक, रिक्षा थांबे आणि पीएमपीएमएल थांब्यांवरही हा उपक्रम होणार आहे. त्यामुळे या उपक्रमात आपणही सहभागी होऊन, त्याचे छायाचित्र पाठवायचे आहे.राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगणार आहे. हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने, तो घराघरांत पोहोचावा यासाठी विविध जाहीर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचा उपक्रम ' शांतता... पुणेकर वाचत आहे ' बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहे. या उपक्रमात शहरातील प्रत्येकाने या ठरलेल्या वेळेत, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले पुस्तक वाचायचे असून, वाचनासाठी प्रेरणा इतरांनाही द्यायची आहे. या उपक्रमासाठी अनेक पुणेकर आणि संघटना सरसावल्या असून, दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.पुणे शहरात विमानतळ, मेट्रो स्टेशन, एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक, पीएमपीएमएल, रिक्षा अशा महत्त्वाच्या वाहतुकीच्या साधनांद्वारे दररोज लाखो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी उपक्रम राबविण्यात येण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुण्यातील सरकारी आणि खासगी कार्यालये, आस्थापने यांनी उस्फूर्तपणे आपला उपक्रम नोंदवावा, असे आवाहन पांडे यांनी केले आहे.पुणेकर म्हणून काय करता येईल !- या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, वाचन करतानाचे आपले छायाचित्र आम्हाला https://pbf24.in/register लिंक वर किंवा क्यूआर कोडवर पाठवावे.- फेसबुक, एक्स, लिंकडीन, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमावर #पुणेपुस्तकमहोत्सव #PuneBookFestival2024 या हॅशटॅगसह शेअर करावा.- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, कंपन्या आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवावा. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीbusinessव्यवसायSchoolशाळाuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालय