Pune Bar Association - पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. हेमंत झंजाड
By नम्रता फडणीस | Updated: February 1, 2025 11:40 IST2025-02-01T11:38:20+5:302025-02-01T11:40:25+5:30
बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर रात्री मतमोजणी झाली

Pune Bar Association - पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. हेमंत झंजाड
पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अॅड. हेमंत झंजाड हे विजयी झाले. उपाध्यक्षपदी अॅड. समीर भुंडे, अॅड. सुरेखा भोसले तर सचिवपदी अॅड. पृथ्वीराज थोरात, अॅ. भाग्यश्री गुजर हे विजयी झाले. खजिनदारपदी अॅड. इंद्रजित भोईटे यांची निवड झाली.
बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर रात्री मतमोजणी झाली. त्यात अॅड. हेमंत झंजाड यांना ३३२९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. प्र. नलावडे यांना १७१४ मते मिळाली. अॅड. हेमंत झंजाड यांनी १६१५ मतांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदासाठी चार जण रिंगणात होते. त्यात अॅड. समीर भुंडे (३३३३), अॅड. सुरेखा भोसले (१९१९) मते मिळवून विजयी झाले. अॅड. सागर गायकवाड (१६४८), अॅड. वनमाला अनुसे (१४२८) मते मिळाली.
सचिवपदासाठी पाच उमेदवार उभे होते. त्यात अॅड. पृथ्वीराज थोरात (३१७४) आणि अॅड. भाग्यश्री गुजर (३१५६) मते मिळवून विजयी झाले. अॅड. महेंद्र दलालकर(७८६), अॅड. गणेश थरकुडे (६५४), अॅड. सुषमा यादव (८३५) मते मिळाली. खजिनदारपदी अॅड. इंद्रजित भोईटे विजयी झाले.
ऑडिटरपदी अॅड. केदार शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बार असोशिएशनची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष : अॅड. हेमंत झंजाड
उपाध्यक्ष : अॅड. समीर भुंडे, अॅड. सुरेखा भोसले
सचिव : अॅड. पृथ्वीराज थोरात, अॅड. भाग्यश्री गुजर
खजिनदार : अॅड. इंद्रजित भोईटे
ऑडिटर : अॅड. केदार शितोळे
कार्यकारिणी सदस्य : अॅड. मावाणी पुनम, अॅड. पवार माधवी, अॅड. नेवाळे भारती, अॅड. पवार प्रशांत, अॅड. श्रीकांत चोंधे, अॅड. प्रसाद निगडे, अॅड. स्वप्नील जोशी, अॅड. आकाश गलांडे, अॅड. राज खैरे आणि अॅड. गणेश माने