शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

'..तर मी 'त्या' मंत्र्यांचे नाव फडणवीस अन् शिंदेंच्या कानावर घालेन' अजित पवारांचा नितेश राणेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:39 IST

नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा काम सर्वांचेच आहे. सरकारचा जास्त आहे.

पुणे - राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून आला आहे. तर विरोधकांकडून टीका टिपणी केली जात आहे. अशातच आमदार नितेश राणेंनी औरंगजेबच्या कबरीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कबर पाकिस्तानात पाठवून द्या असं राणे म्हणाले आहेत. शिवनेरी किल्यावर शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने राणें यांनी केलेल्या विधानावर वरून राजकीय वातावरण तापले असून  त्यांच्या या विधानावर मविआतील नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. तर आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी त्यांना समज दिली असती असं म्हणत नितेश राणेंना टोला लगावला आहे.  अजित पवार म्हणाले, 'मी त्याबद्दल माझी भूमिका स्पष्ट केली आहे. परत परत तेच मुद्दे काढू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह सर्व महापुरुषांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच काम सर्वांचेच आहे. सरकारचे जास्त आहे. माझ्यासहित सर्वांनी हे केलं पाहिजे. माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी त्यांना सांगेन पण दुसऱ्या मंत्र्यांनी बोलले तर फडणवीस आणि शिंदेंच्या कानावर घालेन' असं म्हणत त्यांनी इशारा दिला.नेमकं काय म्हणाले होते नितेश राणेसगळ्यांची भावना एकच आहे. ही पण जोरात साजरी व्हावी. अशी समस्त हिंदू समाजाची इच्छा आहे. ती सरकारपर्यंत आम्ही नक्की पोहोचवण्याचं प्रयत्न करू. औरंगजेबाच्या कबरीबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, आज हिंदू समाजाची भावना हीच आहे. आज महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवलं. त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. काही लोकांना ती मोठी आठवण वाटते. ती आम्हाला हिंदू समाज म्हणून नको आहे. कोणाला ती पाहिजे असेल तर पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं. तीच भावना मी आज व्यक्त केली आहे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विचारांचे कार्यकर्ते पूर्ण समाज बोलतोय की, ती कबर महाराष्ट्रात नको. ती भावना आपल्याला कळायला हवी. म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNitesh Raneनीतेश राणे Ajit Pawarअजित पवारAurangzeb Tombऔरंगजेबाची कबर