शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ambil Odha : भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठीच राष्ट्रवादीने घडवून आणली आंबील ओढा कारवाई : भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 21:16 IST

पण आम्ही कदापि राष्ट्रवादीचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही: भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे : राष्ट्रवादी आघाडीला पंधरा वर्षात जेवढा पुण्याचा विकास करता आला नाही.त्यांच्या काळात वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या योजना भाजपच्या गेल्या चार वर्षांच्या काळात गतिमान झाल्या. विकासकामांचे आव्हान पेलण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये क्षमता नाही. त्यामुळेच भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठी आंबील ओढा येथे राष्ट्रवादीने काँग्रेसने कारवाई घडवून आणली. मात्र, आम्ही कदापि राष्ट्रवादीचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात भाजप पुुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी इशारा दिला आहे. 

पुण्यातील आंबील ओढा येथील कारवाई प्रकरणी चांगलेच राजकारण पेटले आहे.पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरु आहे. आता भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मुळीक म्हणाले,  सहा महिन्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. साम, दाम, दंड, भेद या सर्वप्रकारच्या नीतींचा अवलंब करून या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. याच उद्देशाने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंबील ओढा परिसरातील नागरिकांवर अवैध पद्धतीने कारवाई करण्यात आली. ज्यामुळे निष्पाप रहिवाशांना बेघर व्हावे लागले. नागरिकांना रस्त्यावर आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला पुढील निवडणुकीत पुणेकर रस्त्यावर आणतील.

पुण्याचा विकास करायला भाजपा सक्षम आहे. हे आव्हान पेलण्याची क्षमता राष्ट्रवादी कॉंग्रेसची नाही. त्यामुळेच प्रशासनातील काही अधिकार्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपची विकासाची प्रतिमा डागाळण्यासाठी अवैध मार्गाने आंबील ओढा परिसरातील रहिवाशांवर कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणले. याचा राग पुणेकरांमध्ये असून त्याचे प्रत्यंतर आज आले. माझ्यासोबत प्रशासनाशी चर्चा करायला चला ही खासदार सुप्रिया सुळे यांची विनवणी आंबील ओढा कारवाईसाठी आंदोलन करणाऱ्या पुणेकरांनी धुडकावून लावली. राष्ट्रवादीने पुणेकरांबरोबरचे हे कुटील राजकारण थांबवावे असा इशाराही मुळीक यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका