शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:36 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. (CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray)

पुणे- मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो वडगाव शिंदे, हवेली येथील असून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून, त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Airport police arrested one for posting an offensive post on Facebook about CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. घटनात्मक पदावर असलेल्या आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशी कृती केल्या मुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. 

तत्पूर्वी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाजपा सोशल मीडियाचे पुणे शहर संयोजक विनीत वाजपेयी (वय ३८, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान -गेल्या आठवड्यात, सोशल मीडियावरील बनावट अकाउंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणे तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ दरम्यान हा प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय ३४, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, तो गुन्हा पिंपरी -चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPuneपुणेPoliceपोलिस