पुणे :पुणे वनपरीक्षेत्रातील हवेली तालुक्यातील मौजे भिलारवाडी येथील निसर्ग हॉटेल येथे अंबर ग्रेस (व्हेल माशाची उलटी) व चिंकारा या वन्यप्राण्याचे शिंगे याची विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानूसार त्यांनी छापा टाकून तस्करी होणारे अवयव जप्त केले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनूसार त्यांनी भिलारवाडी येथील निसर्ग हॉटेलमध्ये सापळा लावून अंबर ग्रेस (अंदाजे रक्कम ७५ लाख रू.) व चिंकारा वन्यप्राण्याचे शिंगे (अंदाजे रक्कम २५ हजार रू.) ताब्यात घेतली.
भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नूसार आरोपीविरूध्द वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी हेमराव सिकंदर मेहता (रा. बालाजीनगर), ऋतिक नवनाथ लेकुरवाले (रा. थेरगाव) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताठे यांच्या नेतृत्वाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.
समवेत वनपरीमंडळ अधिकारी विशाल यादव, प्रमोद रासकर, वैभव बाबर, वनरक्षक संभाजी गायकवाड, अनिल राठोड, राजकुमार जाधव, श्रीराम जगताप, ओंकार गुंड, विनायक ताठे सहभागी झाले.