शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीतील लवळे फाटा येथे भरधाव टेम्पोचा थरार; 5 वाहनांना धडक,अपघाताचा CCTV समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:33 IST

टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या वाहनांना धडक बसली.

मुळशी :पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवळे फाटा येथे काल दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने रिक्षा, कार आणि दोन दुचाकींसह एकूण पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, आयशर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या वाहनांना धडक बसली. या धडकेत एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. धडक बसलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगाने येणारा टेम्पो दुचाकीस्वारांना उडवताना आणि पुढील वाहनांना धडक देताना स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मुळशीतील पौड पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Tempo Hits 5 Vehicles in Mulshi; Accident Caught on CCTV

Web Summary : A speeding tempo in Mulshi's Lavale Phata crashed into five vehicles, including a rickshaw and cars. Several are injured, one seriously. The accident, caused by suspected brake failure, was captured on CCTV. Police are investigating.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र