शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident : बाह्यवळण वारजे मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:54 IST

जखमी अवस्थेतील अफाक आणि फरमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अफाक याचा मृत्यू झाला होता.

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात एक जण जखमी झाला. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अफाक अहमद आझाद खान (वय २९) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

अपघातात फरमान अनिस खान (वय १९) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टेम्पो चालक कमरुद्दीन तजम्मुल खान (वय २९, रा.पिंपरिया, बहारिच, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ट्रक चालक शाम श्रीहरी धुमाळ (वय ४१, रा.एककुंडी, जि.कोल्हापूर) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून भरधाव वेगाने टेम्पो निघाला होता. वारजे भागातील साने चौकात भरधाव टेम्पो ट्रकवर आदळला. ट्रकच्या मागील बाजूचे नुकसान झाले. अपघातात ट्रकमधील क्लीनर अफाक खान आणि फरमान खान हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी अवस्थेतील अफाक आणि फरमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अफाक याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात