पुणे - शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून चारचाकी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील मुख्य रस्त्यावर एक चारचाकी वाहन चालक यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या डिव्हायडरला जोरात धडकली. या भीषण धडकेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात पोहोचवले.
या प्रकरणी कोंढवा पोलीस चौकीत वाहन चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वाहन चालवताना सतर्कता बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Web Summary : A reckless U-turn in Pune's Kondhwa resulted in a severe accident. A person was seriously injured after a car hit a divider. Police are investigating using CCTV footage. The incident caused traffic congestion.
Web Summary : पुणे के कोंढवा में लापरवाही से यू-टर्न लेने के कारण गंभीर दुर्घटना हुई। एक व्यक्ति कार के डिवाइडर से टकराने से गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस सीसीटीवी फुटेज का उपयोग करके जांच कर रही है। घटना से यातायात बाधित हुआ।