शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरने ४ जणांना उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 08:39 IST

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Pune Accident ( Marathi News ) : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर १४ वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी हा टँकरसह अल्पवयीन मुलाला अडवून ठेवले आहे.

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार

पुण्यात काही दिवसापूर्वीच कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना उडवले होते, या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता हा दुसरा अपघात घडला आहे. 

पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर  असून  बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलाच्या आत्याने पूजा जैन यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. त्यावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्यावर बाल न्याय मंडळाने आदेशात दुरुस्ती करून या मुलाची रवानगी ५ जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात केली. नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव १२ जूनपर्यंत आणि त्यानंतर २५ जूनपर्यंत सुधारगृहातील मुक्काम वाढविला होता.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेPoliceपोलिस