हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:02 PM2021-06-29T14:02:16+5:302021-06-29T14:15:36+5:30

कॅफे आणि हॉटेल चालकांचे खर्चाचे गणित जुळेना

In Pune | हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

Next

सतत बदलणाऱ्या नियमांचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. रेस्टॉरंट्स ४ वाजेपर्यंत सुरू असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचा फटका बसून जवळपास १००० हॉटेल कायमची बंद झाली आहेत. पुण्यातील पोजिटीव्हीटी रेशो लक्षात घेता हॉटेल व्यवसायाला सूट द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जवळपास आठवडाभर हॉटेल व्यवसाय नियमित सुरू झाल्या नंतर शासनाचा बदललेल्या नियमांमुळे पुणे पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यात गेलं. यामुळे शहरातील सर्व हॉटेल ४ वाजता बंद करण्याचा आदेश निघाला.४ नंतर फक्त पार्सल देण्याची परवानगी मिळाली. यामुळे संध्याकाळी सुरू झालेले अनेक कॅफे आणि रेस्टॉरंट्स पुन्हा बंद झाले.अनेक कॅफेना पार्सल देण्यावर व्यवसाय करणे परवडत नसल्याने कॅफे मालकांनी तर कॅफे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बंद करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. तर हॉटेल मधले कर्मचारी आणि इतर सर्व खर्च यामुळं हॉटेल सुरू ठेवणे देखील अवघड होत असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे. याच मुळे वर्षभरात पुणे शहरातील जवळपास १००० हॉटेल बंद पडली असल्याचे पुणे रेस्टॉरंट्स आणि होटेलीयरस असोसिएशनचे (प्राहा) म्हणणे आहे. 

याबाबत लोकमतशी बोलताना प्राहाचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले," हॉटेल सुरू होणार म्हणून आम्ही कामगारांना विमानाने आणले. अनेक लोक अजूनही यायला तयार नाहीत. पण हॉटेल सुरू झाले असे वाटेपर्यंत पुन्हा एकदा ४ वाजेपर्यंत सुरू ठेवायची परवानगी मिळाली. 

१५ टक्के आधीच बंद पडले आता उरलेले ५ ते १० टक्के बंद पडतील अशी शक्यता आहे.त्यामुळे आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी पुण्याची परिस्थीती लक्षात घेऊन इथल्या हॉटेल चालकांना पूर्वी प्रमाणे व्यवसाय करायची परवानगी द्यावी."

Web Title: In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.