Pune : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जागीच ठार  

By नम्रता फडणीस | Updated: November 21, 2024 11:08 IST2024-11-21T11:08:02+5:302024-11-21T11:08:02+5:30

याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune: A young woman passenger on a two-wheeler was killed on the spot in a collision with a truck   | Pune : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जागीच ठार  

Pune : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जागीच ठार  

पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय २४, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणीचे नाव आहे.

अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय २४, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरात (वय २९, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण आणि त्याची मैत्रीण सोनी कात्रज भागातून निघाले होते.

त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सोनी ही चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.

Web Title: Pune: A young woman passenger on a two-wheeler was killed on the spot in a collision with a truck  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.