शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

pune: आयपीएस निलेश अष्टेकर यांच्यावर पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: May 6, 2023 10:10 IST

Pune News: पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- नितीश गोवंडेपुणे : पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय विधवा महिलेकडे अष्टेकर यांनी लैंगिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आयपीएस नीलेश अष्टेकर यांनी महिलेला फेसबुक मेसेंजरवर संदेश पाठवून पुण्यात आयपीएस अधिकारी म्हणून काम करतो अशी ओळख सांगितली आणि तिला पोलीस दलात भरती व्हायचे आहे का अशी विचारणा केली. तेव्हा तिने तिच्या बहिणीचा मुलगा पोलिस प्रवेश परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगितले. मुंबई पोलिस भरती मोहिमेत तो नापास झाल्याचे तिने सांगितले असता अष्टेकर यांनी तुझ्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळेल याची खात्री देतो असे सांगत तिचा नंबर घेतला. आपल्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळावी, अशी इच्छा असल्याने ती महिला अष्टेकरच्या संपर्कात होती.

दरम्यान अष्टेकर यांनी व्हॉट्सअप मेसेज आणि फोनद्वारे अनेकदा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करत अश्लील मेसेज पाठवले तसेच अश्लील व्हिडिओच्या लिंक देखील पाठवल्या. त्यानंतर अष्टेकर याने महिलेला व्हॉट्सअ‍प कॉल करून अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला तिच्या मुलीला त्याच्याकडे पाठवण्यास सांगितले. हा सगळा प्रकार बघता महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार केली. अष्टेकर हे त्यांच्या राहत्या घरातून व कार्यालयातून तिच्याशी संवाद साधत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या आधारे अष्टेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नारायण शिरगावकर हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे