शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 20:58 IST

Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  

पुणे - कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, एफएसएलने दिलेले अहवाल ही पोलिसांनी दिले आहेत.  पोलिसांनी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०), शिवानी अग्रवाल (वय दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल केले आहे.

कल्याणी नगर भागात १९ मे च्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालविलेल्या पोर्शे कार च्या धडकेत आयटी अभियंता अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडविले. यात दोघे जागीच ठार झाले. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाल न्याय मंडळाने मुलाला तत्काळ जामीन देताना निबंध लिहिण्यास सांगितल्याने समाजमध्यमात टीकेची झोड उठली होती. यादरम्यान मुलाच्या आई वडिलांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या कटात  ससूनच्या डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. या पाच जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रानुसार, पोर्शे प्रकरणात  ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे, यात प्रत्यक्षदर्शींच्या ही समावेश आहे.

आम्ही आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोप पत्र दाखल केले आहे.  पुढील काही दिवसात १७३ (८) प्रमाणे पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येईल. डीएनए आणि इतर काही अहवाल येणे बाकी आहे. ते पुरवणी दोषारोपपत्र सोबत देण्यात येतील- शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी