शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : पहिलीत शिकणा-या चिमुकलीवर 6 जणांचे अत्याचार, 5 जण अल्पवयीन : 5 महिन्यांपासून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 08:17 IST

पुण्यात पहिलीत शिकणा-या ८ वर्षांच्या चिमुरडीवर ६ जण गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणा-या ८ वर्षांच्या चिमुरडीवर ६ जण गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका १८ वर्षांच्या मुलाला अटक केली असून, अन्य ५ जण अल्पवयीन आहेत़याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, हा घृणास्पद प्रकार आॅगस्ट महिन्यापासून सुरू होता. ही मुलगी आणि मुले एकाच ठिकाणी राहण्यास असून, त्यातील दोन मुले १० वर्षांचे असून बाकीचे १२, ९ व ६ वर्षांचे आहेत. वस्तीमधील एकाजणीने या मुलीच्या आजीला तिची मुले छेड काढतात, असे सांगितले़. ही मुलगी वारंवार आजारी पडायची, गेल्या काही दिवसांपासून ती पोट दुखत असल्याची तक्रार करीत होती. त्यामुळे आजीने तिला एका डॉक्टरांकडे नेले.

डॉक्टरांना तपासणीत या मुलीच्या अंगावर काही रॅशेस दिसून आले, डॉक्टरांनी आपली शंका तिच्या आजीकडे बोलून दाखविली. त्यानंतर आजीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने मारणार नाही ना, असे घाबरत घाबरत विचारले व त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. ही मुले तिला टेरेसवर घेऊन जात असत, तसेच एखाद्याच्या घरात कोणी नसेल तर त्याच्या घरात घेऊन जात असत. आजीने या मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितला, त्यांनी १८ वर्षांच्या मुलाला जाब विचारता त्याने कबूल केले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात 6 ते 12 या वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं  असून निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :PuneपुणेGang Rapeसामूहिक बलात्कारStudentविद्यार्थीRapeबलात्कारCrimeगुन्हाSchoolशाळा