पुणे : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन दोघांच्या हत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 11:18 IST2018-04-02T10:28:10+5:302018-04-02T11:18:33+5:30
पूर्ववैमनस्यातून आठ ते दहा जणांनी दोन जणांवर कोयत्याने डोक्यात वार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

पुणे : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन दोघांच्या हत्येचा प्रयत्न
पुणे : पूर्ववैमनस्यातून आठ ते दहा जणांनी दोन जणांवर कोयत्याने डोक्यात वार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सातारा रोडवरील धनकवडे पेट्रोल पंपासमोर रविवारी (1 एप्रिल) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात हर्तिक सोनवणे (वय 18 वर्ष ) आणि दत्तात्रये पाटोळे जखमी झाले आहेत. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्तिक सोनवणेनं सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी राजू कचरावत, शुभम कसबे व त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्तिक सोनवणे व दत्तात्रय पाटोळे हे रविवारी रात्री धनकवडे पेट्रोल पंपाजवळ उभे असताना राजू कचरावत व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन कोयत्याने हर्तिकच्या कपाळावर, पाठीवर, डाव्या हातावर सपासप वार करुन त्यांना जबर जखमी केले. त्याचवेळी त्याचा मित्र दत्तात्रय पाटोळे यांच्या डोक्यात वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळी करीत आहेत.