Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३३३ जणांची कोरोनावर मात, तर २५६ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:55 IST2021-08-01T18:52:51+5:302021-08-01T18:55:50+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ६१७ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३३३ जणांची कोरोनावर मात, तर २५६ नवे रुग्ण
पुणे : शहरात रविवारी २५६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ६१७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.८६ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४१७ असून, आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ८७ हजार ७०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८७ हजार ४२१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार २३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७७४ जणांचा मृत्यू झाला आहे.