Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २५० जणांची कोरोनावर मात, तर २४९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 19:59 IST2021-08-04T19:59:02+5:302021-08-04T19:59:10+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ३१२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २५० जणांची कोरोनावर मात, तर २४९ नवे रुग्ण
पुणे : शहरात बुधवारी २४९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ३१२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.९९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३४८ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २९ लाख ८ हजार ८७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८८ हजार ४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार ९०९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७९२ जणांचा मृत्यू झाला आहे.