शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:18 IST

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीचे पाणी आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी

ठळक मुद्देपालखी सोहळ्याच्या इतिहासात हा सलग दुसऱ्या वर्षी पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्थान

देहूगाव: 'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' बोला पंढरीनाथ महाराज कि जय, अशा जयघोषात अन् तुतारीच्या वादनात इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये संत तुकारामांच्या पादुकांना आज सकाळी नीरा स्नान घालण्यात आले. कोरोनाच्या प्रभावामुळे मोजक्याच वारकरी भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. टाळ, मृदूंग, तुतारीवादन तसेच हरिनामाच्या जयघोषात इंद्रायणीचा परिसर दुमुदूमून गेला होता.   यावेळी वेळी भजनी मंडप ते इंद्रायणी नदीचा घाटा पर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पालखी व मंदिर, उत्तर दरवाजाला देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाने पायी पालखी सोहळ्याल्या परवानगी न दिल्याने श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका १ जुलैच्या प्रस्थानानंतर येथील भजनी मंडपात ठेवून नित्य पूजा पाठ सुरू ठेवण्यात आलेले आहेत. 

इतिहासात हा सलग दुसऱ्या वर्षी पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्थान 

पालखी सोहळ्याचा आज १५ वा दिवस असून पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला जातो. यावेळी परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नाऩ घातले जाते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे यंदाही हे स्नान शक्य झाले नाही. पालखी सोहळ्याच्या इतिहासात हा सलग दुसऱ्या वर्षी पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्थान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता मंदिरातील भजनी मंडपातून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका साडेसात वाजता संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी डोक्यावर घेतल्या. यावेळी चौघडा, शिंगाडे, वीना व टाळ मृदंगाचा व हरिनामाचा आणि ज्ञानोबा तुकाराम हा मंत्रोच्चार करीत पादुका स्नानासाठी काढण्यात आल्या.

यावेळी गरुड टक्के, अब्दागिरी भागवत धर्माच्या पताका सेवेकऱ्यांनी खांद्यावर घेतल्या, सराटीचे ग्रामस्थांनी निरानदीचे पाण्याने भरलेला घडा आणला होता. हा घडा घेवून भजन करीत सर्व उपस्थित भाविक इंद्रायणी नदीच्या घाटावर गेले. तेथे प्रथेप्रमाणे दही, दुध, मध, पिठीसाखर, अत्तर व केळी यांच्या पंचामृताने सुभाष टंकसाळे यांनी निरानदीच्या पाण्याने व इंद्रायणी नदीच्या पाण्यामे जलाभिषेक घातला.

जलाभिषेकानंतर सेवेकऱ्यांनी गरूड टक्के, अब्दागिरी व भागवत धर्माची भगवी पताकांनी देखील नदीमध्ये स्नान घातले. पादुकांच्या खाली नवीन वस्त्र टाकण्यात आले. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांची आरती घेण्यात आली. या ठिकाणी फळे, पेढे व खडीसाखरेचा महाप्रसाद दाखविण्यात आला. इंद्रायणी तिरावरून पुन्हा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पुन्हा पादुका डोक्यावर घेतल्या व उपस्थित भाविक भजन गात मंदिरात आले. मंदिराच्या आवारात आल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर पादुका मंदिरातील भजनी मंडपात स्थिरावल्या. 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीWaterपाणीSocialसामाजिक