शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पंचरंगी लढत

By admin | Updated: September 26, 2014 05:25 IST

महायुती व आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील इच्छुकांना आठही मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची संधी मिळणार

पुणे : महायुती व आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील इच्छुकांना आठही मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पुण्यात पंचरंगी लढत होणार आहे. त्यामुळे पुण्यातील आठही मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षे आघाडी व महायुतीच्या मतांवर बालेकिल्ला राखलेले विद्यमान आमदार चिंतेत आहेत. नवीन कार्यकर्त्यांत मात्र संधी मिळणार असल्याने उत्सुकता आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजप व शिवसेनेची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची १५ वर्षांपासून आघाडी होती. केंद्र, राज्य शासनापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी व युती होती. पुण्यातील लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत युती व आघाडी होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांत चारही पक्षांची प्रत्येक मतदारसंघात ताकद वाढण्यास मर्यादा होत्या. ती खदखद प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला होती. पुण्यातील विधानसभेच्या आठ जागांपैकी प्रत्येकी चार जागा शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला होत्या. त्यामुळे उर्वरित चार मतदारसंघांत प्रत्येक पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला सर्वच विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला सर्व जागा लढविण्याचा आत्मविश्वास असला तरी आघाडी तुटल्यामुळे विधानसभेची राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार आहे. त्यामुळे शहरातील आठही मतदारसंघांतील विजयाची गणिते बदलणार असून, कोणाची किती ताकद आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)