शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: आरसीबीच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी; जल्लोष करणाऱ्या ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:45 IST

एफसी रोडवरील गुडलक चौकात जमावाने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला, रस्त्यावरील वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीचे वर्तन करत, शांतता भंग करून फटाके फोडले

पुणे : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय झाला. यानिमित्त शहरातील डेक्कन परिसरातील गुडलक चौकात मोठ्या संख्येने आरसीबी टीमचे चाहते एकत्र येऊन त्यांनी विनापरवानगी जल्लोष केला. दरम्यान, चाहत्यांनी हुल्लडबाजी करत रस्ता अडवून धरल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी याबाबत ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बंगळुरूने अंतिम सामना प्रथमच जिंकल्याने त्याच्या चाहत्यांनी देशभरात ठिकठिकाणी माेठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून जल्लोष केला. अशाचप्रकारे मंगळवारी रात्री आयपीएलचा सामना संपल्यानंतर आरसीबी टीमचे समर्थक जर्सी घालून तसेच हातात झेंडे घेऊन दुचाकीवर रस्त्याने फिरत होते. एफसी रोडवरील गुडलक चौकात जल्लोष करण्यासाठी समर्थक माेठ्या संख्येने एकत्रित झाले होते. त्यांनी विजयाची घोषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. रस्त्यावरील वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीचे वर्तन करत, शांतता भंग करून फटाके फोडले.

त्यामुळे याप्रकरणी डेक्कन पाेलिसांनी ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, या प्रकरणात ३० ते ४० जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१), १३५, १११, ११२ / ११७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५PoliceपोलिसIndiaभारत