शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 16:30 IST

विवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देमनपा दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी, खाजगी दवाखाने इत्यादी ठिकाणी १३२० बुथचे नियोजन एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, उद्याने, बांधकामाच्या साईटसवर, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बूथ येत्या रविवारी (१० मार्च ) शहरातील जवळपास २ लाख ७४ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट

पुणे : महापालिकेची पल्स पोलिओ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून साडे चार हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रविवारी शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना लस देण्यासाठी काम करणार आहे. पालिकेने २ लाख ७४ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे अतिरीक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल यांनी सांगितले. रविवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयारी सुरु आहे. अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी पालिकेमध्ये यासंदर्भातील बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी लसीकरण विभागाचे डॉ. अमित शहा यांनी लसीकरण मोहिमेबाबत करण्यात आलेल्या नियोजनची माहिती दिली.सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी, खाजगी दवाखाने इत्यादी ठिकाणी १३२० बुथचे नियोजन करण्यात आले आहे.  ३९६० स्वयंसेवक, २८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक,  महापालिकेचे १०० डॉक्टर्स व ५ विभागीय अधिकारी, महापालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खाजगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटेरीयन्स, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग असणार आहे. सर्व एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, काही उद्याने, सर्व बांधकामाच्या साईटसवर, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बूथ कार्यरत राहणार आहेत.याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. चेतन खाडे यांनीही पल्स पोलिओ मोहिमे संदर्भात माहिती दिली. आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी याप्रसंगी सांगितले कि शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त बालकांना १० मार्च २०१९ रोजी लसीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने सर्व तयारी झालेली आहे. रोटरी क्लबचे डॉ. प्रकाश पाटील यांनीही मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले जाईल असे सांगितले. याप्रसंगी परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.....................महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या रविवारी (१० मार्च ) शहरातील जवळपास २ लाख ७४ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे. - रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सGovernmentसरकार