शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 14:22 IST

पोलीस व शिवसैनिक यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक

पौड : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने घोटावडे फाटा येथे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कोश्यारी यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कोश्यारी पद हे घटनात्मक पद असल्याने त्यांच्या प्रतिमेचा आपण अवमान करू शकत नाही अशी पौड पोलिसांनी आंदोलकाना समज देऊन प्रतिमेचा अवमान करण्यापासून रोखले. 

यावेळी शिवसेनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी तीव्र शब्दात कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, तालुका प्रमुख सचिन खैरे, जि. प.सदस्य शंकर मांडेकर,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, माजी सभापती भानुदास पानसरे यांनी मनोगते व्यक्त केली. सहकार आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आंदोलनामुळे काही काळ वाहतूक वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहतूक पूर्ववत केली.

पोलीस व शिवसैनिक यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, कोश्यारी यांनी सुरुवातीपासून महाराष्ट्रात कायम भांडणे लावायचेच काम केले. कोश्यारी हे भाजपा धार्जिणे धोरण स्विकारून काम करीत आहेत. त्यामुळेच कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेने उठवलेला आवाज दाबण्यासाठीच संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळेच कोश्यारी हे अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPuneपुणेSocialसामाजिकagitationआंदोलनShiv Senaशिवसेना