शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद ही केवळ धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

- अनंत फडके, सहसंयोजक, जन आरोग्य अभियान ---------------------------- आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार कोटींची तरतूद खूप जास्त असल्याचे ...

- अनंत फडके, सहसंयोजक, जन आरोग्य अभियान

----------------------------

आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार कोटींची तरतूद खूप जास्त असल्याचे सांगून पाठ थोपटून घेतली जात आहे. स्वातंत्र्यापासून गेली ७४ वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी १ टक्का एवढीच तरतूद केली जात होती. या वेळी ही तरतूद जीडीपीच्या सव्वादोन ते अडीच टक्क्यांच्या दरम्यान आहे. ती ५ टक्क्यांपर्यंत जायला हवी होती. कृषी क्षेत्राला ज्याप्रमाणे सेझ लावला, त्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रासाठी लावणे आवश्यक होते. तो निधी आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वापरता आला असता. १७ हजार प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याची घोषणा करण्यात आली. भारतातील बहुतांश प्राथमिक व जिल्हा आरोग्य केंद्रे मोडकळीस आलेली आहेत. केंद्रांच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. अद्ययावत वैद्यकीय सेवा देणारी सुसज्ज शासकीय रुग्णालये उभी करण्यासाठी तरतूद करायला हवी होती.

तातडीच्या सेवा देणारी १५ रुग्णालये आणि २ मोबाईल रुग्णालये ही गंमतीशीर तरतूद आहे. भारतभरासाठी ही संख्या अत्यल्प आहे. देशात सुमारे ८०० जिल्हे आहेत. तेथील जिल्हा रुग्णालयांमधील आयसीयू सेवा भक्कम करायला हवी. प्रत्येक राज्यात किमान २-३ साथरोग रुग्णालये स्थापन व्हायला हवीत. एनआयव्हीसारख्या चार प्रयोगशाळा भारतात सुरु होणार आहेत. साथरोगाचा आवाका लक्षात घेता ही संख्या २००-२५० इतकी असायला हवी होती. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांबाबत अर्थसंकल्पात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली असली तरी दुर्गम भागातील लोकांपर्यंत लस पोहोचवण्याच्या दृष्टीने यंत्रणा उभी राहायला हवी. हेल्थ इन्फर्मेशन सेंटरमध्ये टेलिमेडिसीनचा वापर व्हायला हवा. भारतीयांच्या आरोग्य गरजांचा विचार आणि अभ्यास झालेला नाही, असे दिसून येत आहे.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन