शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

'नोकरीत कायम करून घ्या..' शिक्षक दृष्टीहीनांचे शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:59 IST

न्याय न मिळाल्यास पुणे ते उपमुख्यमंत्री निवास स्थान मुंबई येथे पदयात्रा करणार आहोत आणि येथे जाऊन बेमुदत आमरण उपोषणास बसणार

पुणे : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र च्या वतीने दृष्टीहीन दिव्यांगशिक्षकांना नोकरीत कायम करुन घेण्यासाठी शिक्षण आयुक्तालयासमोर दृष्टिहीनांकडून घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागाचे महासचिव शिवाजी लोंढे यांच्याकडून शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. 

सम्रग शिक्षा अभियानातील (प्राथमिक विभाग) २९८ दिव्यांग विशेष शिक्षकांचा सामायोजनाचा प्रश्न तातडीने सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दृष्टीहीन दिव्यांग आंदोलनासाठी पुणे शिक्षण आयुक्तालय या ठिकाणी आले होते.          शिक्षण आयुक्तांना राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने  वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार दोन वेळा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले‌. परंतु या प्रस्तावावर कुठलेही प्रकारची अमंलबजावणी झालेली दिसून आली नाही. यामध्ये प्रशासन या प्रस्तावासंदर्भात पूर्णपणे टाळाटाळ करत असून दाद देत नसल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष जनार्दन कोळसे  यांनी सांगितले.

दिव्यांग विशेष शिक्षक समायोजनाचा शासन निर्णय पारित होई पर्यंत माघार घेणार नाहीत. न्याय न मिळाल्यास पुणे ते उपमुख्यमंत्री  निवास स्थान मुंबई येथे पदयात्रा करणार आहोत आणि येथे जाऊन बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत. या मध्ये कुठल्याही प्रकारची हाणी झाल्यास याला शासन व प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. तसेच या दिव्यांग विशेष शिक्षकांना आपण वेठीस धरल्यास दिव्यांग वेगवेगळ्या कृतीचा अवलंब केल्याशिवाय राहणार नाहीत असे पुणे विभागीय उपाध्यक्ष चंद्रकांत खराटे यांनी यावेळी सांगुन प्रशासनाला इशारा दिला आहे. 

२०१७-१८ पासून आम्ही याचा पाठपुरावा करत असून जवळपास २९८ शिक्षक हे आजही नोकरीत कायम नाही. त्यांना कायम करुन घ्यावे आणी योग्य ते पगार द्यावी. अंमलबजावणी न झाल्यास आमरण उपोषण करु असे पुणे विभागीय अध्यक्ष जनार्दन कोळसे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकDivyangदिव्यांगEducationशिक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagitationआंदोलन