पिंपरी-चिंचवड शहर परिसरात स्पा सेंटरच्या नावे वेश्याव्यवसाय; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 14:10 IST2023-02-16T14:09:52+5:302023-02-16T14:10:02+5:30
स्पा सेंटरचा मालक शैलेश वाल्हे हा फरार...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात स्पा सेंटरच्या नावे वेश्याव्यवसाय; एकाला अटक
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. तेथे छापा टाकून पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत स्पा सेंटर मॅॅनेजरला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १३) चिखली येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दीपाली मुंडकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केलेल्या स्पा सेंटरच्या मॅॅनेजरचे नाव भुषण दत्तात्रय माळी (वय २४, रा. पिंपळे सौदागर) असे असून, स्पा सेंटरचा मालक शैलेश वाल्हे हा फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलैश याने पैशाचे आमिष दाखवून पीडित महिलांना स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून स्वत:ची उपजीविका भागवत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची सुटका करत स्पा सेंटरच्या मॅॅनेजरला अटक केली.