शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

By नितीश गोवंडे | Updated: February 16, 2024 15:06 IST

महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलवून घेत तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन महिला स्पा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) दुपारी साडेचारच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ८ येथे करण्यात आली आहे.

मोकडा गेथाईसॉन्ग (मूळ रा. थायलंड) हीच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार रईसा समीर बेग (३८) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलवून घेत तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाThailandथायलंडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी