शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

जलसंपदाला हवेत पुण्यातील ५२ लाख नागरिकांच्या आधार कार्डाचे पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:22 IST

महापालिकेने पाणीवाटपासाठी दिली होती आकडेवारी : थकबाकी तातडीने भरण्याची मागणी

पुणे : महापालिकेसोबत नव्याने पाणीवाटपाचा करार करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने शहरामध्ये ५२ लाख नागरिक राहात असल्याचे सांगितले आहे; परंतु महापालिकेने शहरामध्ये ५२ लाख नागरिक राहत असतील, तर त्यांचे आधार कार्डाचे पुरावे सादर करा, अशी मागणी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे केली आहे; तसेच पाणीपट्टीच्या थकबाकीचे १७ कोटी रुपयांची थकबाकीदेखील तातडीने भरावी, अशी मगाणीदेखील केली आहे.

पुणे महापालिकेने पुणे शहराला देण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागासोबत केलेल्या पाणी कराराची मुदत २८ फेबु्रवारी २०१९ रोजी संपुष्टात येत आहे. या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापालिकेने शहरामध्ये निवासी व आणि फ्लोटिंग, असे एकूण तब्बल ५२ लाख नागरिक राहात असल्याचे सांगितले. यामुळे लोकसंख्येचा विचार करता नवीन पाणी करारामध्ये पुणे शहराला १७ टीएमसी पाणी मिळावे, असा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने देण्यात आला. सध्या करारानुसार महापालिकेने ११.५० टीएमसी पाणी उचलने अपेक्षित असताना महापालिका अधिकचे पाणी उचलत असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

जुन्या करारामध्ये शहरामध्ये विविध महाविद्यालय, विद्यापीठ येथील हॉस्टेलमध्ये राहाणारे विद्यार्थी व व्यापाराच्या निमित्त शहरात दररोज येणाºया फ्लोटिंग नागरिकांचा विचार करण्यात आला नाही; परंतु आता नवीन करार करताना या सर्व फ्लोटिंग नागरिकांचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.आज होणार बैठक : मध्यमार्ग काढणारआयुक्तासोबत झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या हद्दीत दाखविण्यात आलेल्या ५२ लाख नागरिकांची संख्या पुराव्यानिशी सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, हॉस्टेलमध्ये राहाणाºया विद्यार्थ्यांची आधार नोंदणीची माहिती मागितली आहे.हे विद्यार्थी इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील असल्याने त्यांच्या आधार नोंदणीची माहिती स्थानिक प्रशासनाकडे नसल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितल्यानंतरही, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी ते मान्य केले नाही; तसेच पाणी बिलापोटी पुणे महापालिकेकडे थकबाकी ७२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यामध्ये आतापर्यंत ५५-५४ कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली असून, मार्च अखेरपर्यंत शिल्लक १७ कोटी रुपये देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. लोकसंख्येचे पुरावे व थकबाकीसंदर्भांत दोन्ही बाजूने संमतीने मध्यममार्ग काढण्यासाठी आता पुन्हा १ मार्च रोजी महापालिकेत बैठक घेण्यात येणार आहे.न्यायालयासाठी लोकसंख्येच्या पुराव्याची मागणीमहापालिकेच्या वतीने सध्या पुणे शहरामध्ये ५२ लाख लोकसंख्या राहत असल्याचे पाटबंधारे विभागाला सांगितले आहे. महापालिकेने दावा केलेल्या लोकसंख्येबाबत एक व्यक्ती न्यायालयात गेली असून, पाटबंधारे विभागाकडून याबाबत नवीन पाणी करार झाल्यानंतर, न्यायालयात लोकसंख्येचे पुरावे सादर करावे लागतील, यामुळे पाटबंधारे विभागाकडून लोकसंख्येच्या पुराव्याची मागणी केली आहे.- व्ही. जी. कुलकर्णी,पाणीपुरवठा विभागप्रमुख

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी