सेंद्रीय खत वापरास प्रोत्साहन द्या : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:00 PM2018-04-13T14:00:59+5:302018-04-13T14:00:59+5:30

रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे.

Promote the use of organic fertilizers: Girish Bapat | सेंद्रीय खत वापरास प्रोत्साहन द्या : गिरीश बापट

सेंद्रीय खत वापरास प्रोत्साहन द्या : गिरीश बापट

Next
ठळक मुद्देखरीप हंगाम व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश

पुणे: जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन वाढविण्याबरोबरच संबंधितांनी शेतक-यांच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा करावा.त्याचप्रमाणे सेंद्रीय खतांचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे,त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद करावी, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी दिल्या.
विधान भवन येथे खरीप हंगाम २०१८ आढावा व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.
 रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपध्दतीने जिल्ह्यातील ९३२ किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीत दिली. त्यावर या सर्व विक्रेत्यांवर अधिका-यांनी लक्ष ठेवून शेतक-यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी,अशा सुचना बापट यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.त्याचप्रमाणे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. तसेच मागेल त्याला शेततळे या अंतर्गत २०१६ ते २०१८ या कालावधीत एकूण १९८९ शेततळे पूर्ण झालेली आहेत. मात्र,अजूनही ६८ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच पुढील वर्षात अडीच हजार शेततळ्यांचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 सन २०१७- १८या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत १२९६ कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी २९ हजार ४२१ कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतक-यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बापट यांनी दिले.
दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या वर्षातील कामे सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करावीत,अशा सुचना देण्यात आल्या. यंदा जलयुक्त शिवार योजनेतील गावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यात लक्षपूर्वक काम करावे,असे आदेशही बापट यांनी दिले.

Web Title: Promote the use of organic fertilizers: Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.