‘ट्रायकोकार्ड’ जैविक घटक तंत्रज्ञानावर भर : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:37 AM2018-02-05T00:37:14+5:302018-02-05T00:39:18+5:30

​​​​​​​अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशक ांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.

'Trichocard' Biological Components: Technology will reduce the use of chemical pesticides! | ‘ट्रायकोकार्ड’ जैविक घटक तंत्रज्ञानावर भर : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणार!

‘ट्रायकोकार्ड’ जैविक घटक तंत्रज्ञानावर भर : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणार!

googlenewsNext
ठळक मुद्देनिंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.
वैदर्भीय शेती, शेतकरी हे किडी व रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त होत असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांकडून अपेक्षित उत्पादन तर मिळालेच नाही, किंबहुना रासायनिक कीटकनाशक ांच्या अतिरेकी किंवा अशास्त्रीय वापराने जीवित हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानासह अल्प खर्चाच्या शाश्‍वत उपाययोजनासुद्धा विविध माध्यमांतून शेतकर्‍यांपर्यंत पोहोविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने विदर्भातील सहा तालुक्यांतील ५१ शेतकर्‍यांना जैविक घटकांचे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. शेतकर्‍यांना घाटेअळी विषाणू, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व ढाल किडा या सर्व जैविक घटकांचे उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली.  रविवारी संपलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षणात जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रभारी डॉ. नीरज सातपुते, तसेच डॉ. अनिल कोल्हे, डॉ. गजानन लांडे व डॉ. सुनील भलकारे यांनी यासंबंधी प्रात्यक्षिकासह विस्तृत माहिती शेतकर्‍यांना दिली. कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी रासायनिक कीटकनाशक ांचे गुणधर्म व वापराच्या पद्धती समजावून सांगत सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता शाश्‍वत व अल्प खर्चाच्या जैविक कीटकनाशक ांचे व मित्र कीटकांचे महत्त्व अतिशय साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच शेतकर्‍यांनी जैविक घटकाचे उत्पादन करण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कृषिभूषण शेतकरी हनवंतराव देशमुख यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त करीत पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती करताना जैविक घटकांचा प्रभावी वापर शेतकर्‍यांना लाभदायक ठरणार असून, जीवित हानी टळेल व विषमुक्त अन्न उपलब्ध करण्याचे आपले कर्तव्य पार पडण्याचा आनंदसुद्धा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. 

Web Title: 'Trichocard' Biological Components: Technology will reduce the use of chemical pesticides!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.