शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मृत महिलेला भासवले कोरोनाग्रस्त डॉक्टर; सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:39 IST

शुक्रवारी एका महिलेचा फोटो कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला...

ठळक मुद्देघरच्यांसह रुग्णालय व्यवस्थापनालाही त्रास ; महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह या महिलेच्या घरच्यांनीही सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली

पुणे : सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही खातरजमा न करता पोस्ट व्हायरल होणं नवीन नाही. त्यामुळे अनेकांना मनस्तापही झालेला बघायला मिळतो. असाच एक प्रकार पुण्यातही घडला असून शुक्रवारी एका महिलेचा फोटो कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही तासात ती पोस्ट अनेक फेसबुक पेजवर आणि अनेकांच्या व्हाट्स अपच्या स्टेट्सवरही दिसत होती. मात्र त्याचे सत्य समोर आल्यावर सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.    संबंधित मृत महिलेचा फोटो सोशल मीडियावर कोरोना बाधित म्हणून वापरण्यात आला. इतकेच नव्हे तर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात रुग्णसेवा बजावत असताना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले होते. प्रत्यक्ष माहिती घेतल्यावर नायडू प्रशासनाने असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जहांगीर रुग्णालयाने या महिलेचे निधन त्यांच्या रुग्णालयात २२ एप्रिल रोजी झाले असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. मात्र त्या डॉक्टर होत्या की नाही याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या महिलेच्या घरच्यांनीही सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे मनस्ताप झाल्याचेही म्हटले आहे. हा प्रकार ज्यांनी केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

-------------संबंधित महिलेचे निधन आमच्या रुग्णालयात झाले असले तरी त्यांना कोरोनाची लागण नव्हती. त्यांचे रिपोर्ट एनआयव्हीमध्ये तपासणीस पाठवले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. डॉ सत्यजित सिंग गिल, वैद्यकीय संचालक, जहांगीर रुग्णालय 

फॉरवर्ड मेसेज डिलिट आणि माफीही मागितली संबंधित महिलेचा फोटो असलेली पोस्ट अनेकांनी फॉरवर्ड केली होती. सत्य समजल्यावर मात्र त्यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट  केली. इतकंच नाही तर काहींनी माफीही मागितली. त्यामुळे खात्री न करता फॉरवर्ड करणारे तोंडावर पडलेले बघायला मिळाले. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूWomenमहिला