शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, प्रगतीसाठी संगीतशास्त्र लाभदायक

By admin | Updated: May 9, 2017 03:21 IST

स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद हरपून बसला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. यातून

स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद हरपून बसला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी माणसाने आपल्या कामकाजाच्या चाकोरीव्यतिरिक्त स्वत:च्या आरोग्य आणि प्रगतीसाठी कलात्मक छंद जोपासणे गरजेचे आहे, कलात्मक आविष्कारामुळे माणूस ताणतणावातून काही काळ मुक्त राहू शकतो. यासाठी संगीताची आवड गरजेची आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्र सांभाळून कलाक्षेत्रात कामकाज करणारे डॉ. विकास वैद्य यांनी व्यक्त केले.डॉ. विकास वैद्य म्हणाले, ‘‘संगीतशास्त्र हा असा एक कलात्मक आविष्कार आहे. ज्यामुळे माणूस स्वत:चे दु:ख बाजूला सारून या कलाविष्कारात समरस होत असतो.’’ मला बालपणापासूनच संगीतशास्त्र आणि मूर्ती बनविण्याचा छंद होता. या छंदामुळे मला आनंद मिळतोच, परंतु या आनंदाचा अंतर्भाव इतरांच्या जीवनात सहभागी व्हावा, म्हणून पाटस (ता. दौंड) सारख्या छोट्या गावातून कलावंतांना मोफत संगीतशास्त्रांचे धडे देत आहेत.हार्मोनियम, तबला आणि गायन या तिन्ही कला अवगत असल्याने या कला तरुणांना अवगत करण्यासाठी प्रेरित करीत असतो. छोट्या-मोठ्या मैफलीतून या नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामकाज करत आहे. एखाद्या कलावंताला घडविणे यासारखा दुसरा कुठला आनंद नाही.भारतीय संगीत समृद्ध असून या संगीताला पुरातन काळापासून राजाश्रय आहे. शास्त्रीय गायन किवा पाश्चात्त्य संगीत या शास्त्रात भाषेत फरक असेल, परंतु संगीतातील उद्दिष्ट एकच असते. आम्हाला आजोबांपासून संगीताचा वारसा आहे. बुवासाो पवार, पं. गवारे, पं. डॉ. विकास कशाळकर, मंजुषा पाटील यांच्याबरोबर माझे काका आणि गुरुजी पं. शरद करमळकर यांचे मार्गदर्शन मिळाले आणि मिळत आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये लय, सूर, संगीत असतेच फक्त आपल्याला ज्ञात व्हावे लागते. नवीन पिढीमध्ये एकदम मोठे नाव व्हावे असे वाटते. परंतु, संगीत शिकण्याकरिता गुरुंचे मार्गदर्शन, साधना आणि संगीताविषयी निष्ठा असणे आवश्यक आहे. संगीतकलेला मेहनत आणि सराव याशिवाय कुठलाही शॉर्टकट नाही. हे कलावंतांनी लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रीय गायन अवघड असते, असा चुकीचा समज समाजात आहे. परंत, त्याचे थोडे जरी ज्ञान झाले असले तर कलाकार शास्त्रीय संगीत सोडून गाणार नाही. याव्यतिरिक्त सुगम संगीत देखील सर्वश्रेष्ठ संगीत आहे. सुगम संगीतात बबनराव नावडीकर, गजानन वाटवे, सुधीर फडके, किशोरकुमार यांची गाणी आजही अजरामर आहेत. संगीतक्षेत्र मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. समृद्ध भारतीय संगीत नवीन पिढीमध्ये रुजविण्याचे काम ज्येष्ठ संगीतकारांनी निस्वार्थीपणे करावे. नवीन नवीन कलाकार समाजापुढे उभे करावेत, की जेणेकरून भारतीय संगीत अजरामर राहील.पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राग आणि आजार’ यांचे तीन दिवस शिबिर घेतले होते. या शिबिरात संगीत रागांचा रोगांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. यावरून आजार बरा करण्यासाठी कलात्मक संगीताची जोड ही महत्त्वाची ठरू शकते, असा माझा एकंदरीत अनुभव आहे. कारण कलात्मक क्षेत्राबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातदेखील कामकाज आहे. त्यानुसार निद्रानाश, मानसिक ताणतणाव या आजारांवर बागेश्री, दरबारी कानडा, यमन, मालकंस, अभोगी या रागांचा उपयोग होताना दिसून आला. उच्च रक्तदाब, मधुमेह या रोगांवर पुरिया-धनाश्री- तोडी या रागांचा उपयोग होतो. एकाग्रता वाढविण्यासाठी भीमपलास, तर अस्थमासारख्या आजारावर मियाँ मल्हार हा राग उपयुक्त पडतो.