शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:21 IST

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला.

इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला.अत्यंत अडचणीच्या काळात सर्व सभासद, ऊस वाहतूकदारांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकजुटीने केलेली जीवतोड मेहनत यामुळे हे शक्य झाले, अशा शब्दांत कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.या वेळी संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, की मागील सलग दोन गाळप हंगामामध्ये कारखान्याच्या क्षमतेपेक्षा कमी गाळप झाले. जवळपासच्या कारखान्यांनी उसाची पळवापळवी केली. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. ऊस उत्पादकांना कॅनॉलचे पाणी मिळाले नाही. वीजकपातीचे संकट निर्माण झाले. उजनीची पाणीपातळी मागील उन्हाळ््यामध्ये कमालीची खालावली होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये कर्मयोगी सहकारीच्या सभासदांनी उसाचे पीक जोपासले.कारखान्याने कमीत कमी क्षेत्रात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी कारखानास्थळावर अत्याधुनिक माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभी केली आहे. दर्जेदार जैविक खते, सेंद्रिय खते व गांडुळखताची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. त्यास सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऊसपिकाबाबत सभासदांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी ऊसपिक परिसंवादाचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले. या वेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, रमेश जाधव, यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, मानसिंग जगताप, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, विष्णू मोरे, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, वसंत मोहोळकर, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, संचालिका जयश्री नलवडे, कार्यकारी संचालक बी. जी. सुतार, वर्क्स मॅनेजर एम. पी. निकम, चीफ केमिस्ट यू. के. कांदे, मुख्य शेतकी अधिकारी जे. एस. शिंदे, इंजिनिअर कळसाईत, चीफ अकौंटंट एल. बी. जाधव, डिस्टिलरी इन्चार्ज पी. डी. पाटील व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे