शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:29 IST

२०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही

इंदापूर : भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा करुन, त्यांनाच जवळ घेत, स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले असल्याची टीका शरद पवार यांनी मंगळवारी ( दि. १६) केली.    पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, भाजपचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद ,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव पालवे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.वाघ पॅलेस येथे अभूतपूर्व गर्दीत हा कार्यक्रम पार पडला.

 शरद पवार म्हणाले की, २०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शंभरातल्या बेकार तरुणांपैकी ८७ तरुणांना आज देखील नोकरी नाही. काळा पैसा संपवून गरिबांच्या खिशात १५ लाख रुपये जमा करणार असे त्यांनी सांगितले. १५ लाख सोडा, १५ रुपयेसुद्धा गरीबांच्या खिशात पडलेले नाही. २०१६ मध्ये नोटाबंदी केली. शंभर, पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या. पण काळा पैसा संपला नाही. एका बाजूला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खतांचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची, असा प्रकार होत असल्याबद्दल त्यांनी टीका केली.

आता पुन्हा मोदी यांच्या हातात देशाची सत्ता द्यायची नाही, हे लोकांच्या लक्षात आलं आहे. ज्या कुटुंबांनी स्वातंत्र्याआधी व नंतर देशाची सेवा केली केली त्या कुटुंबांकडे देशाची सत्ता द्यायची की, देशातल्या माणसांमध्ये, जातींमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये एक प्रकारचा दुरावा व अंतर वाढवण्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला. त्यांच्या हातात सत्ता द्यायची, हा निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.

आतापर्यंत मारामारी, मतभेद नको यासाठी आम्ही लक्ष देत नव्हतो. मात्र आता बारामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गाव असतील तिथे अनेक कार्यक्रम,धोरणे राबवली.संस्था उभ्या केल्या.हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.

 

टॅग्स :Puneपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवार