हलत्या झाेपाळ्यावरुन निघणार शारदा गजाननाची मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:27 PM2018-09-22T16:27:19+5:302018-09-22T16:36:16+5:30

अखिल मंडई मंडळाच्या शतकाेत्तर राैप्य महाेत्सवी वर्षानिमित्त यंदा प्रथमच शिवशाैर्य रथात हलत्या झाेपाळ्यावर शारदा-गजानान विराजमान हाेणार अाहेत.

procession of mandai ganpati will be different | हलत्या झाेपाळ्यावरुन निघणार शारदा गजाननाची मिरवणूक

हलत्या झाेपाळ्यावरुन निघणार शारदा गजाननाची मिरवणूक

Next

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शतकाेत्तर राैप्य महाेत्सवी वर्षातील गणेशाेत्सवाची वैभवशाली मिरवणूक उद्या निघणार अाहे. यंदा प्रथमच शिवशाैर्य रथात हलत्या झाेपाळ्यावर शारदा-गजानान  विराजमान हाेणार अाहेत. शारदा-गजाननाची झाेपाळ्यावरुन निघणारी विसर्जन मिरवणूक हे पुणेकरांसाठी अाकर्षण असणार अाहे. 

    हा शिवशाैर्य रथ 14 फूट बाय 18 फूट असून उंची 30 फूट इतकी असणार अाहे. रथावर हनुमान, देवतांचा सेनापती, कार्तिकेय, नंदी, मुषक यांच्या मूर्ती असणार अाहेत. यामध्ये हनुमानाची मूर्ती 11 फूट असून इतर मूर्ती 9 फूट उंचीच्या असणार अाहेत. रथामध्ये शंकराची मूर्ती न वापरता त्याची शैैर्याची प्रतिके वापरली अाहेत. महाभारतातील युध्दांच्या रथाप्रमाणे या रथाचे स्वरुप असणार अाहे. या रथाची संकल्पना शिल्पकार विशाल ताजणेकर यांची अाहे. शिवगर्जना, नूमवि, गजर ही ढाेल-ताशा पथके अाणि न्यू गंधर्व बॅन्ड मिरवणूकीत सहभागी हाेणार अाहेत. जयंत नगरकरांचा नगारा मिरवणूकीच्या अग्रभागी असणार अाहे. तर खळदकर बंधूचे सनईवादन हाेणार अाहे. 

    मंडईच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक मुख्य उत्सव मंडपातून उद्या सायंकाळी 6 वाजता निघणार अाहे. मुख्य उत्सव मंडप ते मुख्य मिरवणुकीत सहभागी हाेण्यापर्यंत पाेलिसांनी रस्ता खुला करुन द्यावा, अशी विनंती मंडळातर्फे दक्षिण विभागाचे अप्पर पाेलीस अायुक्त रविंद्र सेनगावकर यांना करण्यात अाली अाहे. यंदा मंडळाचे शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्ष असून पाेलिसांनी सहकार्य केल्या मुख्य मिरवणुकीत लवकरात लवकर सहभागी हाेण्यास मंडळ व कार्यकर्ते सज्ज असतील, असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थाेरात यांनी सांगितले. 

Web Title: procession of mandai ganpati will be different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.