शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ भूसंपादन मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 20:30 IST

शेतक-यांना जमिनीचा मोबदला कोणत्या स्वरूपाचा दिला जावा, याबाबतची निश्चिती झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअद्याप प्रशासनाकडून हालचाली नाहीशेतकऱ्यांना जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी अदा केला जाणारनिर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा

पुणे : राज्य शासनाने पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा निर्णय घेऊन एक महिना झाला. मात्र, त्यानंतर विमानतळाच्या भूसंपादनाबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, शेतक-यांना भूसंपादनाच्या बदल्यात कोणत्या स्वरुपाचा मोबदला दिला जावा, यासंदर्भातील निश्चितीचे काम सुरू आहे,असे राज्याचे जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी ‘लोकमत’शी सांगितले. संरक्षण विभाग व केंद्र शासनाच्या सर्व समित्यांकडून पुरंदर विमानतळासाठी गेल्या महिन्यातच सर्व मान्यता प्राप्त झाल्या.त्यामुळे राज्य शासनाने पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा अध्यादेश प्रसिध्द केला. तसेच समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम अतिशय जलद गतीने करणारे नवल किशोर राम यांची पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. परंतु, शासनाकडून जिल्हा प्रशासनाला भूसंपादनाच्या बाबत अद्याप पुढील आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यातच पीएमआरडीएतर्फे केल्या जाणा-या रिंगरोडचे काम रखडले आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीएमआरडीएला नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विमानतळाकडे जाण्यासाठी रस्त्ये आवश्यक आहेत. रिंगरोड व इतर रस्त्यांची कामे पावसाळ्यात करता येणे शक्य नाही. त्यामुळे विमानतळ व त्याच्याशी निगडीत असणारी विकास कामे ठप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे.  शिवतारे म्हणाले, शेतक-यांच्या जमिनींची खरेदी करावी, त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी आदी पर्यायांचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील पारगाव,खानवडी,मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील सुमारे २ हजार ३६७ हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शासनास सादर करण्यात आला. जमीन मोबदल्यासाठी अंदाजे २ हजार ७१३ कोटी रुपये तर फळझाडे, विहिरी,ताली इत्यादी साठी अंदाजे ८०० कोटी मोबदला खर्च अपेक्षित असल्याचे शासनाला कळविण्यात आले. मात्र,शेतकऱ्यांना जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी अदा केला जाणार, निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणार,जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन दिली जाणार की जमीन मालकाला भागीदार करुन घेतले जाणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकारी व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.   

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरीMONEYपैसा