मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ११४४ वाहनचालकांवर पुणे वाहतूक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:08 IST2018-01-01T14:01:05+5:302018-01-01T14:08:13+5:30
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ११४४ वाहनचालकांवर काल रात्री वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात ९७० दुचाकी आणि १७४ तीनचाकी, चारचाकींचा समावेश आहे.

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ११४४ वाहनचालकांवर पुणे वाहतूक विभागाची कारवाई
ठळक मुद्दे११४४ वाहनचालकांवर काल रात्री वाहतूक विभागाने केली कारवाई२८ चौकात वाहतूक पोलिसांतर्फे ब्रिथ अॅनालायझर मशीनच्या साह्याने तपासणी
पुणे : दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ११४४ वाहनचालकांवर काल रात्री वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात ९७० दुचाकी आणि १७४ तीनचाकी, चारचाकींचा समावेश आहे. दारू पिऊन गाडी चालू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते. तरीही ते न जुमानता अनेकांनी नववर्ष साजरे करताना मद्याचा आधार घेतला व त्यानंतर गाडी चालवीत घरी जात असताना पोलिसांच्या कारवाईत ते सापडले.
शहरातील २८ चौकात वाहतूक पोलिसांतर्फे ब्रिथ अॅनालायझर मशीनच्या साह्याने तपासणी करण्यात येत होती. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.