शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:40 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे...

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी लागली. पण ही वाहतूक सुरू असताना नियमांकडे मात्र डोळेझाक होत आहे. दुचाकीवर एक आणि चारचाकीमध्ये केवळ दोघांनाच परवानगी असूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. तर दुसरीकडे रिक्षा आणि पीएमपी बससेवेबाबत मात्र प्रशासनाची ताठर भूमिका अजूनही कायम आहे. त्यामुळे या सेवाही काही निर्बंधासह सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी करण्यात आली. मागील महिन्यात दुचाकी व चारचाकी वाहनांना काही अटींवर परवानगी देण्यात आली. देशांतर्गत विमानसेवाही सुरू झाली. १ जूनपासून २०० रेल्वेगाड्याही धावू लागल्या. पण रिक्षा व पीएमपीच्या बससेवा बंदच ठेवण्यात आली. दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला तर चारचाकीमध्ये दोघांना परवानगी आहे. पण प्रत्यक्षात सध्या या नियमांकडे बहुतेक जण दुर्लक्ष करत आहेत. दुचाकीवरून दोघे जण तर चारचाकीमध्ये दोनहून अधिक व्यक्ती प्रवास करताना दिसत आहेत. पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवडाभरात तर खासगी वाहनांची रस्त्यांवरील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली.याविषयी नाराजी व्यक्त करताना रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांसह तुळशीबागही सुरू करण्यावर निर्णय घेतला जातो. पण जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल तर रिक्षा व बसला परवानगी द्यायलाच हवी. दुचाकीवरून जाण्यास महिलांसह ज्येष्ठांना मयार्दा आहेत. त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षा सुरू झाल्याशिवाय जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. त्यामुळे रिक्षाला दोन प्रवासी नेण्याची परवानगी द्यायला. रिक्षाचालक पूर्ण दक्षता घेऊन प्रवाशांना सेवा देतील. रिक्षा सुरू झाल्यानंतर त्यांना याबाबत प्रशिक्षणही दिले जाईल.---------------पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के बस मार्गावर धावत आहेत. त्याप्रमाणे पुण्यातही नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सज्ज आहेत. प्रामुख्याने वर्दळीचे मार्ग, एमआयडीसी, आयटी कंपन्या, बाजारपेठा, महत्त्वाच्या ठिकाणी बस सोडण्याला प्राधान्य असेल. बसमध्ये मार्किंगचे कामही सुरू आहे.- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी---------------दुचाकी व चारचाकी तसेच कॅब वाढल्याने आधीच रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. विमा, पासिंग, परवाना इतर शुल्क भरमसाठ वाढले आहे. आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने रिक्षाला मान्यता द्यायला हवी.- किशोर राखुंडे, रिक्षाचालक

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस