शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक, आढे गावाजवळील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:47 IST

Bus Fire On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील  आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी  प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

तळेगाव दाभाडे -  मुंबई -  पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील  आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी  प्रवासी बसचा टायर फुटल्यानेबसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही दुर्घटना शनिवारी (दि .२७)सकाळी सातच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बसमध्ये ३६ प्रवासी होते. बसचालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखत  बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत मुंबईहून -  पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला. आकाशात धुरांचा लोट कोसळला होता.अपघाताचे वृत्त समजताच आयआरबी  पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा, वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. सुमारे सव्वा तासानंतर  आग पूर्णपणे आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी  झाली आहे. बसचा टायर फुटून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघातfireआग