शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘छत्रपती’साठी पृथ्वीराज जाचक यांचे सारथ्य; ‘साहेबां’ बरोबरच्या 'लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 6:11 PM

गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारे जाचक यांचे साहेबांबरोबरचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे.

ठळक मुद्देदोन्ही कुटुंबाचे छत्रपती कारखान्यासमवेत भावनिक नाते

बारामती: राज्यात एके काळी पहिल्या पाच साखर कारखान्यांमध्ये गणला जाणारा भवानीनगर (ता.इंदापुर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे.कारखान्यापुढे सहवीजनिर्मिती प्रकल्प,विस्तारवाढीचेच्या प्रकल्पांचे मोठे कर्ज आहे. कामगारांचे पगार लांबले आहेत.कारखाना अडचणीत गेल्याने ऊसउत्पादक सभासद संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी अध्यक्ष शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याकडे या कारखान्याचे  ‘सारथ्य’ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर सोमवारी(दि ३)  मुंबई येथे ‘सिल्व्हर ओक ’ या निवासस्थानी  ‘साहेबां’ बरोबर ‘लंच डिप्लोमसी’मध्ये  शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारी जाचक यांचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे. याला निमित्त ठरली माळेगांव कारखान्याची काही महिन्यांपुर्वी पार पडलेली निवडणुक. कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी ‘छत्रपती’ कारखान्याच्या स्थितीचे भांडवल केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेत योग्य पाऊल उचलण्याची भूमिका भर प्रचार सभेत जाहीर केली.शिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वडील दिवंगत गोविंदराव पवार देखील या कारखान्याचे संचालक आहेत.दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी कारखान्यात काम केले आहे. शिवाय पवार कुटंबिय कारखान्याचे सभासद देखील आहेत. त्यामुळे जाचक यांच्याप्रमाणे पवारांचे देखील या कारखान्यासमवेत भावनिक बंध आहेत. त्यानंतर जाचक आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला.यामध्ये बारामती नगरपरीषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी महत्वाची भूमिका केली.

 आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाचक,त्यांचे चिंरंजीव कुणाल जाचक यांची  गुजर यांनी भेट घडवुन आणली. ही भेट सहकार,राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. पवार यांच्या समवेत ‘लंच डीप्लोमसी’मध्ये जाचक यांच्या छत्रपतीच्या ‘सारथ्या’वर  शिक्कामोर्तब करण्यात आले. जाचक यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव,अभ्यासाची जाण या ‘सारथ्या’साठी महत्वाची ठरली आहे. १७ वर्षांपुर्वी जाचक कारखान्याच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसपासुन बाजुला झाले होते. जाचक यांचे वडील दिवंगत साहेबराव जाचक कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यामुळे जाचक यांचे कारखान्यासमवेत भावनिक नाते आहे.याच पार्श्वभूमीवर सुवर्ण महोत्सवी वर्षात कारखान्याचे अध्यक्षपद असावे अशी जाचक यांची इच्छा होती. मात्र, त्यावेळी अचानक दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. मात्र, सुवर्णमहोत्सवी वर्षात जाचक यांच्या भावनेशी निगडीत इच्छा पुर्ण न झाल्याने जाचक बाजुला गेले होते.तेव्हापासुन शेतकरी कृती समितीच्या माध्यमातुन जाचक कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवुन होते.

‘छत्रपती’ ला ‘यशवंत’ करा, यशवंत होवु देवु नका,अशी भावनिक साद देखील जाचक यांनी वेळोवेळी घातली. त्यासाठी जाचक यांच्या सभा,आंदोलन सुरुच होती. या दरम्यान, सहकारी साखर कारखानदारी अडचणीत गेली. त्यामध्ये कारखान्यावर असणारे कोट्यावधींचे कर्ज वाढतच आहे.या पार्श्वभुमीवर कारखाना पुर्वस्थितीत आणण्यासाठी १७ वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे.मात्र, सध्याची कारखान्याची अवस्था पाहता जाचक यांचे सारथ्य ‘काटेरी’ ठरणार आहे.

सध्या कोरोनामुळे छत्रपतीची निवडणुक प्रस्तावित असुन देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जाचक सध्या कारखान्याचे केवळ सारथ्य करणार आहेत. निवडणुकीनंतर अध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत आहेत.याबाबत ‘लोकमत‘शी बोलताना पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले कि,कारखान्याच्या उभारणीमध्ये पवार आणि जाचक कुटुंबियांचे योगदान आहे.दोन्ही कुटुंबाचे कारखान्यासमवेत भावनिक नाते आहे.त्यामुळे सभासद आणि कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवुन राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.सहकार,साखर धंद्यातील अडचणींबाबत चांगली चर्चा झाली.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कारखाना हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निर्णय पृथ्वीराज जाचक यांनी निर्णय घेतला आहे.या निर्णयाबाबत मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होवुन त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ‘मी’ देखील कारखान्याचा सभासद आहे. सभासदांच्याच प्रपंचासाठी जाचक यांना परत आणण्यासाठी १७ वर्ष माझा प्रयत्न होता,असे गुजर यांनी स्पष्ट केले.————————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण