शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

खाजगी क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना बनवले कैदी; मनुष्यबळ विकास मंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:17 PM

कोचिंग क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची टीका प्रकाश जावडेकर यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी केली.

ठळक मुद्देतरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन उपक्रम यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत देण्यात आला भर

पुणे : सध्या कोचिंग क्लासेसचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. ८ वी पासूनच जेईई वगैरेचे क्लास विद्यार्थी लावू लागले आहेत. त्यातून क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची जोरदार टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली.सीओईपी कॉलेजमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त सचिव सुब्रम्हण्यम, एआयसीटीचे चेअरमन अनिल सहस्त्रबुध्दे, सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा, अभय जेरे यावेळी उपस्थित होते. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.   प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘देशातील तरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त होऊन नवनवीन शोध लावावेत यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसमोर काही समस्या ठेवल्या जाणार आहेत. त्या समस्या त्यांनी तंत्रज्ञानाच्या व शोधाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी विविध प्रयोग करतील, त्या समस्येवर इतर देशांनी काय सोल्युशन काढले आहे याचा धांडोळा घेतील, त्याबाबत नवीन अपडेट काय घडले आहेत याची माहिती घेतील. आपपासात चर्चा करतील. त्यातून ते त्या समस्यांचे समाधान शोधून काढतील. त्यातून त्यांचे खरं शिक्षण घडणार आहे. ही शिक्षणाच्या दुहेरी पध्दतीतून त्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रतिभेला संधी मिळवून देणे खूप आवश्यक बनले आहे. अलीकडच्या काळात कोचिंग क्लासवाल्यांनी इयत्ता ८ वी पासून विद्यार्थ्यांना कैदी बनवून टाकण्यास सुरूवात केली आहे.’’स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला फुलविण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. मागील हॅकेथॉन स्पर्धेचे अत्यंत चांगले निकाल मिळाले आहेत. विविध ५२ प्रकारच्या समस्यांचे विद्यार्थ्यांनी समाधान शोधले आहे. संबंधित मंत्रालय, तंत्रज्ञान विभाग यांच्याकडे ते सोपविण्यात आले असून त्यावर आणखी काम करण्यात येत आहे. तार्किक प्रक्रियेतूनच शोधाचा उगम होतो. ही आनंदाची प्रक्रिया आहे. यातूनच विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमुळे समस्या उभ्या राहिल्याचे आपल्याला अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळते, मात्र हॅकेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थी देशासमोरच्या समस्यांवर समाधान शोधून काढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत भर देण्यात आला आहे.’’अभय जेरे, सुब्रम्हण्यम यांनीही यावेळी विचार मांडले.  

टॅग्स :Studentविद्यार्थी