जेईई टॉपर्सची आयआयटी बॉम्बेला पसंती

By admin | Published: July 6, 2017 07:03 AM2017-07-06T07:03:17+5:302017-07-06T07:03:17+5:30

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत पहिल्या शंभरात क्रमांक पटकवलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आयआयटी

JEE toppers favorite IIT Bombay | जेईई टॉपर्सची आयआयटी बॉम्बेला पसंती

जेईई टॉपर्सची आयआयटी बॉम्बेला पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत पहिल्या शंभरात क्रमांक पटकवलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आयआयटी बॉम्बेला पसंती दिली आहे. पहिल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला आहे, तर पहिल्या ५० विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेत प्रवेश निश्चित केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला आहे. २०१६ मध्ये पहिल्या १०० विद्यार्थ्यांपैकी ६७ विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेला पसंती दिली होती. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत पहिला आणि दुसरा क्रमांक पटकाविलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्ससाठी आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेंतला आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये एकूण ९२९ जागा आहेत. त्यापैकी फक्त १४ जागा पहिल्या प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त आहेत.
आयआयटीमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या टक्क्यात वाढ झाली आहे. देशभरातील विविध आयआयटीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीत ७५ मुलींनी प्रवेश निश्चिती केली आहे. हा आकडा ९० पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे. पहिल्या ५० विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेत प्रवेश घेतला आहे, त्यात ३ मुलींचा समावेश असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या प्रवक्त्यांनी दिली.
जॉइंट सीट अलॉकेशन अथॉरिटीकडून प्रवेशासाठी ७ प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. या फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी आणि देशातील सरकारी अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीत ३६ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यापैकी २९ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विविध आयआयटीमधील ६ हजार ७९९ जागा रिक्त आहेत. पहिल्या प्रवेश फेरीनंतर विविध आयआयटीमधील ४०० जागा रिक्त आहेत.

Web Title: JEE toppers favorite IIT Bombay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.