शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जुनाट यंत्रांवर होतेय छपाई

By admin | Updated: August 25, 2015 05:02 IST

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतील विविध विभागांच्या कागदपत्रांची छपाई मात्र २० ते २५ वर्षे जुन्या छपाई यंत्रांवरच होत आहे. महापालिकेचे घोले रस्त्यावरील

- राजानंद मोरे,  पुणेस्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतील विविध विभागांच्या कागदपत्रांची छपाई मात्र २० ते २५ वर्षे जुन्या छपाई यंत्रांवरच होत आहे. महापालिकेचे घोले रस्त्यावरील मामाराव दाते मुद्रणालय जुनाट छपाई यंत्र व अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर दररोज लाखो कागदपत्रांच्या छपाईचा भार सोसत आहे. नगरसेवक-अधिकाऱ्यांच्या व्हिजिटिंग कार्डपासून महापालिकेतील सर्व विभागातील प्रशासकीय कागदपत्रे, तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) लाखो तिकिटे, पासची छपाई दररोज या मुद्रणालयात केली जाते. पालिका प्रशासनाकडून मात्र या मुद्रणालयाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पालिकेतील सर्व विभागांमध्ये आवश्यक कागदपत्रांची छपाई मागील अनेक वर्षांपासून दाते मुद्रणालयातून केली जाते. नगरसेवक-अधिकाऱ्यांची व्हिजिटिंग कार्ड, कार्यक्रमपत्रिका, विविध विभागांसाठी लागणाऱ्या नोंद वह्या, विविध प्रकारचे अर्ज, माहितीपत्रके यांसह विविध कागदपत्रांची छपाई या मुद्रणालयात होते. ई-तिकिटिंग बंद झाल्यानंतर पीएमपीची तिकीट, पास, नोंदवह्या, इतर प्रशासकीय कागदपत्रांची छपाईही येथेच केली जाते. त्यासाठी सध्या मुद्रणालयात दोन वेब आॅफसेट प्रिंटिंग मशिन, तर चार कमी क्षमतेच्या स्वीफ्टेड मशिन आहेत. मात्र, दोन वेब मशिन या २० ते २५ वर्षांपूर्वीच्या आहेत. प्रत्यक्षात या मशिन ५ ते १० वर्षांपूर्वीच बदलणे आवश्यक होते. तरीही याच मशिनवर सध्या दररोज लाखो कागदपत्रांची छपाई केली जात आहे. एका वेब मशिनवर केवळ पीएमपीच्या तिकीट छपाईचे काम चालते. त्यामुळे छपाईचा भार इतर मशिन्सवर पडत आहे. त्यातच अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्नही मुद्रणालयाला भेडसावत आहे. मुद्रणालयासाठी ११२ कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या केवळ ६८ कर्मचारीच राबत आहेत. बाइंडर, मशिन आॅपरेटर, स्टोअर किपर, हेल्पर ही पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. त्यातच दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढतच चालला आहे. तसेच छपाईचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करून काम उरकावे लागत आहे. याबाबत मुद्रणालयाकडून नवीन यंत्र व कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.तिकीट छपाई ३ कोटींवरपीएमपीसाठी लागणाऱ्या तिकिटांची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. मागील महिनाभरात मुद्रणालयाने पीएमपीला विविध दरांची सुमारे तीन कोटी तिकिटे छापून दिली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी तिकीट छपाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तिकीट छपाईचा मोठा बोजा आहे. दररोज १४ ते १५ लाख तिकिटे छापली जात आहेत. पीएमपीकडून यापेक्षा अधिक मागणी झाल्यास यापुढे वेळेवर तिकीट छपाई करून देणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पीएमपीकडे २१ कोटींची थकबाकीमुद्रणालयाकडून पीएमपीला दर वर्षी सुमारे ४ कोटी रुपये किमतीची तिकिटे व इतर कागदपत्रांची छपाई करून दिली जाते. मात्र, मागील काही वर्षांत पीएमपीने या छपाईचा मोबदलाच दिलेला नाही. त्यामुळे तिकीट छपाई व इतर कामाचे सुमारे २१ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती मुद्रणालयाचे व्यवस्थापक जयंत पवार यांनी दिली.मुद्रणालयाला अत्याधुनिक यंत्र मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रिक्त जागा भरण्याबाबतही कळविण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळत नाही. नवीन यंत्र तसेच रिक्त जागा भरल्यास छपाईचा वेग वाढेल.- जयंत पवार, व्यवस्थापक, मामाराव दाते मुद्रणालय