शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा; नरेंद्र मोदी अन् उद्धव ठाकरे दिसणार एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:01 IST

संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

मुंबई/पुणे-  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. (PM Narendra Modi a Visit of Maharashtra) देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत. नरेंद्र मोदींचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगामुळे गोंधळ; देवस्थानाने अभंगात केला बदल 

सदर कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी मुंबईसाठी रवाना होतील. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, लता मंगेशकर फाऊंडेशनचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आता होता. तेव्हा कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. त्याउलट मुख्यमंत्री एका आजीबाईंची भेट घेण्यासाठी गेले होते, ज्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलनाला आल्या होत्या. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा असल्याची चर्चाही रंगली होती. 

सदर कार्यक्रमासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले होते, मात्र निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. सीएमओला हे प्रोटोकॉलच्या विरोधात वाटले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर ठळकपणे व्हायला हवा होता, परंतु तो करण्यात आला नव्हता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMumbaiमुंबई