शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बसथांब्यांच्या किमतीचे गौडबंगाल

By admin | Updated: August 14, 2015 03:05 IST

शहरातील बसप्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनसनाकडून आवश्यकता नसतानाही उभारल्या जाणाऱ्या स्टिलच्या बसथांब्यांच्या

पुणे : शहरातील बसप्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनसनाकडून आवश्यकता नसतानाही उभारल्या जाणाऱ्या स्टिलच्या बसथांब्यांच्या किमतीमध्ये गौडबंगाल असल्याचा प्रकार समोर आला आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून आमदार निधीतून महापालिकेने शहरात उभारलेल्या स्टिलच्या थांब्यांची किंमत ३ लाख असताना, नगरसेवकांच्या निधीतून क्षेत्रीय कार्यालयाने उभारलेल्या बसथांब्यांसाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही बसथांबे एकसारखे असतानाही त्यांची किंमत वेगळी कशी, असा प्रश्न या प्रकाराने उपस्थित झाला आहे. नगर रस्ता परिसरातील प्रभाग तीनमध्ये क्षेत्रीय कार्यालयाने उभारलेल्या बसथांब्यांची माहिती विमाननगर सिटीजन फोरमच्या कनीज सुखरानी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे मागितली होती. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत प्रभागात उभारलेल्या थांब्यांची माहिती दिली आहे. त्यात त्यानुसार, फॉर्च्यून हॉटेल समोर उभारलेल्या थांब्यासाठी ५ लाख ५७ हजार रुपये, बँक आॅफ बडोदा जवळील थांब्यासाठी ५ लाख ३२ हजार रुपये, गंगापूरम येथे उभारलेल्या थांब्यासाठी ५ लाख ६५ हजार रुपये तर, इनॉर्बिट मॉल येथे उभारलेल्या थांब्यासाठी तब्बल ७ लाख ९ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामासाठी २० लाखांची तरतूद असताना तब्बल २३ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, याच प्रभागाशेजारी असलेल्या प्रभाग क्रमांक १८मध्ये याच क्षेत्रीय कार्यालयाने स्टिलचे अशाच प्रकारचे २ बसथांबे उभारले असून, अवघा ४ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे प्रभाग तीनमधील थांब्यांच्या कामात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी सुखराणी यांनी केली आहे.