शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

लोहगाव विमानतळाला जागा देण्याची तयारी, महापालिका आयुक्तांसमवेत झाली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:58 AM

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी हवाई दलाने जागेच्या मोबदल्यात विमानतळ परिसरातीलच जागा मागितली आहे. ही जागा खासगी असल्याने संपादनाचा प्रश्न निर्माण झाला होता.

पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी हवाई दलाने जागेच्या मोबदल्यात विमानतळ परिसरातीलच जागा मागितली आहे. ही जागा खासगी असल्याने संपादनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी महापालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत योग्य मोबदल्यानंतर संबंधित जागा देण्यास जागामालकांनी होकार दर्शविला असल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.लोहगाव विमानतळावरून विमानांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधा आणखी बळकट करण्याची गरज आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय असून, लोहगाव विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) हवाई दलाकडे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा मागितली आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात तितकीच पर्यायी जागेची मागणी हवाई दलाकडून करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य सरकारने २५ एकर जागा हस्तांतरित करावी, असा आदेश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विमानतळ पायाभूत समितीच्या दिल्लीतील बैठकीमध्ये दिले होते. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी (दि. १२) सकाळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमवेत बैठक घेतली. लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक २३७, २४८ आणि २५३ या मिळकतींवर वाहनतळ, कार्यालय आणि साठवणुकीचे आगार यांचे आरक्षण दाखविण्याची प्रक्रिया नगरविकास विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता नगरविकास विभागाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा (एमआरटीपी अ‍ॅक्ट) १९६६ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे