शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर जुजबी कारवाई

By admin | Updated: April 14, 2017 04:15 IST

येथील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकली. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात

जुन्नर : येथील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकली. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. परंतु केवळ जुजबी कारवाई न करता अतिक्रमणाचा पुरता बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. बसस्थानकासमोर रस्त्याच्या कडेला फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांच्या हातगाड्यांसमोर मोठ्या प्रमाणात लाकडी मंडप टाकून अतिक्रमण केले होते. जुन्नर-नारायणगाव रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला गटारावर ही अतिक्रमणे करण्यात आली होती. सामान्य विक्रेत्यांनी त्यांच्या असलेल्या हातगाड्यांच्या पुढे कापडी पाल टाकून ही अतिक्रमणे केलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या या अतिक्रमणामुळे हा परिसराला बकालपण आलेले होते. नवीन बसस्थानकाच्या तीनही प्रवेशद्वाराच्या अगदी लगत ही दुकाने व अतिक्रमणे झाली होती. या अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास हा बसचालकांना होत होता. बसस्थानकातून बस बाहेर रस्त्यावर घेताना या अतिक्रमणामुळे बसचालकांना रस्त्याच्या दोनही बाजूकडून येणारी जाणारी वाहने दिसत नसल्याची तक्रार बसचालक सातत्याने करत होते. परंतु एसटी व्यवस्थापन बसचालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या दुकानदारांचे चांगलेच फावले होते. (वार्ताहर)अतिक्रमणास सुरुवात झाल्याबरोबरच तातडीने कारवाई केल्यास पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत. त्यामुळे बसस्थानकापासून अगदी थोड्याशा अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईत सातत्य असावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.जुन्नर-नारायणगाव रस्त्याची रुंदी २५ मीटर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या साडेबारा मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. तर बाजार समितीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे.