शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 1:17 PM

पुणे रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा थांब्यावर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे..

ठळक मुद्दे प्रीपेड रिक्षासाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी

पुणे : मागील काही वर्षांपासून बंद पडलेली प्रीपेड रिक्षा सेवा शुक्रवार (दि. २) पासून सुरू होणार आहे. पुणे रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा थांब्यावर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेवेसाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, यासाठी ५० रुपयांपर्यंतच्या भाड्यापोटी पाच रुपये, तर त्यापुढील भाड्यापोटी सात रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. काही वर्षांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकासह स्वारगेट व शिवाजीनगर  बसस्थानकापासून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली होती; पण या सेवेच्या अंमलबजावणीतील विविध त्रुटींमुळे काही महिन्यांतच सेवा बंद पडली. त्यानंतर आता ही सेवा पुन्हा शुक्रवारपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रीपेड रिक्षासाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी झाली आहे. रिक्षा अ‍ॅपवर ही नोंदणी सुरू असून अधिकृत रिक्षा व चालकांचाच यामध्ये समावेश केला जात आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व दोन कर्मचारी असतील असे या योजनेचे समन्वयक राहुल शितोळे यांनी सांगितले.  .असे ठरेल भाडेरिक्षामध्ये बसण्याआधीच प्रवाशांना इच्छित ठिकाणचे भाडे मोबाईलवर संदेशाद्वारे समजेल. समजा प्रवासी इच्छित ठिकाणापेक्षा आणखी पुढे गेल्यास रिक्षाचालकाकडील मोबाईल अ‍ॅपमध्ये अधिकचे भाडे अंतरानुसार आपोआप येईल. त्यानुसार प्रवाशांना संपूर्ण भाडे द्यावे लागेल. रिक्षाच्या मीटरप्रमाणेच हे भाडे आकारले जाईल. तत्पूर्वी, प्रीपेड बूथवर प्रवाशांना भाड्याच्या रकमेनुसार ५ किंवा ७ रुपयांचे सेवाशुल्क द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस