शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 13:36 IST

या कार्यक्रमादरम्यान दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे

पुणे: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजामध्ये आक्रोश दिसून येत आहे. शेतकऱ्यांना अजून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर (bjp pravin darekar) यांनी पुण्यात व्यक्त केलं.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. एका बाजूला शेतकरी संकटात असताना सरकारमधील लोकांकडून जंगी स्वागताचे कार्यक्रम म्हणजे मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीची काही झालं की केंद्रावर ढकलायचं ही ठरलेली भूमिका आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल

केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे. अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. केंद्र त्यांची जबाबदारी निभावेल, केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा आणि तात्काळ मदत करा. देवेंद्र फडणवीस यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत, असंही दरेकर यांनी सांगितले. पूर भागाच्या पाहणीकरता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, ही माहितीही दरेकर यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे