शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी- प्रल्हाद सिंह पटेल

By नितीन चौधरी | Updated: November 12, 2022 16:54 IST

मविआ सरकारने जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला; राज्यमंत्र्यांचे आरोप

- नितीन चौधरी

पुणे : महविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात राज्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले. जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला. त्यामुळे आघाडी सरकारच्या शिल्पकार असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली

दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर ते शनिवारी (त. १२) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मविआ सरकारकाळात चांगले काम नाही-

प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले, ''देशात २०१९ मध्ये जलजीवन मिशनला सुरुवात झाली. महाराष्ट्रापेक्षा कमी काम असलेल्या तेलंगणा, हरियाणा आणि गोवा राज्याने महाराष्ट्रापेक्षा चांगले काम करून जल जीवनमध्ये आघाडी घेतली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगले काम झालेले नाही. केंद्राने कोणताही भेदभाव करता सर्व राज्यांना जल जीवन मिशनसाठी निधी दिला. योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे निधी देऊनही कामाला गती या सरकारने दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यास तत्कालीन सरकार जबाबदार असल्याने त्यावेळच्या नेत्यांनी जनेतची माफी मागावी. दरम्यान, २०२४ मध्ये पुन्हा भाजप बहुमताने सत्तेवर येईल आणि त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवारांनी कोणती सहकारी संस्था उभी केली नाहीपटेल यांनी दोन दिवसांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. 'मात्र, मला विकास दिसला नाही तर नागरिकांमध्ये भीती दिसली,' असा आरोपही पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना साहेबच म्हणेल, परंतु त्यांनी एकही सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या माहितीत नाही.'' जगातील अन्य देशांचे तुलनेत भारतात इंधन स्वस्त आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसgoaगोवाTelanganaतेलंगणा